हळद - Turmeric
कोरोना ! कोरोना ! कोरोना ! सगळीकडे कोरोना...... आता तर ९ महिने झालेत. एवढ्या वेळात तर बाळ पण जगात येते. परवा कुठेतरी ऐकलं !!! मी बरेच दिवस झालेत हळदीचे पाणी पिते त्यामुळे मला कोरोना झाला नाही. मध्यंतरी बाबांनी औषध पण काढलं मग काय सर्वजण आयुर्वेदा कडे धावले पण एवढं सगळ घडत असताना खरंच त्याचा उपयोग होतो का?? कोणी तपासून पाहिलंय का??? हा प्रश्न आणि असेच असंख्य प्रश्नाचे निरसन हळदी बाबत आपण या लेखातून करणार आहोत. तुळशी प्रमाणेच हळदीला हिंदू धर्मात धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व आहे. हळदीचा उपयोग दैनंदिन आयुष्यात केला जातो जेवणामध्ये फोडणी ही महत्त्वाची असते. त्या फोडणीमध्ये हळद असेल तर चवच काही वेगळी येते .. जरी हळदीचा उगम चीन असला तरी हळद भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते व त्याचा मूळ भारत आहे असे आपल्याला वाटते.हळदीला हिंदी भाषेत हल्दी असे म्हणतात.. तर इंग्रजी भाषेत टर्मेरिक असेही म्हटले जाते. हळद हळ...