तुळस
| तुळस |
हिंदू संस्कृती मध्ये तुळशी वृंदावनाला खूप पवित्र मानले जाते. तुळस या वनस्पतीला तुळशी किंवा तुलसी असेही म्हणतात. वैज्ञानिक दृष्ट्या तुळस ही फार औषधी असून तिचे मानवी शरीरासाठी अनेक फायदे होत असल्याने तिचा समावेश औषधी वनस्पती मध्ये केला जातो.
तुळशीचे मूळ भारत, इराण असून आता इजिप्त फ्रान्स हंगेरी, इटली, मोरोक्को,युएस येथे आढळते. तुळशीला Ocimum sanctum असे ओळखले जाते आणि ते लमिनेशिया कुटुंबातील आहे. तुळशीचे सेवन केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते.
तुळशीला शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये संतुलन साधणारे आणि ताण तणावाशी जुळवुन घेण्यास उपयुक्त मानले जाते. तुळशीचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. बहुतेक वेळा विविध आजारांकरिता हर्बल चहा म्हणून केला जातो.
तुळशीचा तीव्र सुगंध आणि तुरट चवीमुळे आयुर्वेदात तुळशीला जीवनाचे अमृत असे म्हटले गेले आहे. तुळस साठवलेल्या पाण्यात किंवा शिजवलेल्या आन्नमध्ये तुळशीची पाने शिंपडल्यास त्यातील जिवाणूंच्या वाढीस रोखतात. तुळशीमध्ये "अ" जीवनसत्व, "क" जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या गोष्टींचा समावेश असतो. तसेच यामध्ये बीटा केरोटिन सारख्या अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. जे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करतात.
तुळस |
तुळशीचे उपयोग:
१. तणाव कमी करणे: तुळस दिवसभराचा थकवा कमी करण्यास उपयोगी, अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दुधामध्ये तुळशीची काही पाने टाकून ते दूध पिण्याने फायदा होतो. असे केल्याने आपल्या मज्जसंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीत मोठ्या प्रमाणात अँटी बॅक्टरियल आणि अँटी इंफ्लेमेन्ट गुण असतात. ज्यामुळे शरीरातील रोप्रतिकारक शक्ती तसेच पेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी ही तुळस उपयुक्त आहे. दररोज तुळशीची पान खाल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.
३. महिलांना मासिक पाळी समस्या : महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक प्रकारच्या समस्या होत असतात.या दिवसात महिलांना अतिशय त्रासाला सामोरे जावे लागते. अश्या वेळी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. मासिक पाळीत अनियमितता दूर करण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
४. सर्दी खोकला : तुळशीचा काढा सर्दी खोकला यांवर रामबाण मनाला जातो. काढा बनविण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात मिसळून त्याचे सेवन करा.सर्दी साठी हा काढा अतिशय गुणकारी ठरते.
५. मधुमेहावर नियंत्रण : तुळशीमध्ये असलेले इगेनोल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते.रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायलने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते
तुळशीचे फायदे :
१. ताप : तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार असतो
२. सर्दी: रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळ्याने सर्दी दूर होऊ शकते.
३. घसा खवखवणे : गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी करावी. दमा असणाऱ्या नाही हे लाभदायक ठरते.
४. डोकेदुखी: अतिउष्ण तेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अश्यावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
५. डोळ्यांची समस्या: डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो. तुळशीच्या पानांचा रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकता कमी होण्यास मदत होते.
६. दातांची समस्या : तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट करून लावल्याने हिरड्या व दात यांवर तात्काळ उपचार होतो.
७. त्वचेवरील समस्यांवर तुळशीच्या
पानाचा रस गुणकारी
ठरतो :
तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात त्याचप्रमाणे जीवनसत्व "ए" आणि "ब" मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमण, खाज सुटणे यांसाठी तुळशीच्या पानाचा फार उपयोग होतो.
तुळशीचे पान अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास त्वचा तजेलदार व टवटवीत राहते.तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी होतो.
८. कीटक चावणे, डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यतः : मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अश्या समस्या वाढतात अश्यावेळी ज्या ठिकाणी कीटक चावला त्या ठिकाणी तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी फार गुणकारी असते.
९. किडनी स्टोन च्या समस्येला समोर जाण्यासाठी मध आणि तुळशीच्या पानाचा रस मिश्रित मिश्रण प्यावे.
१०. मानसिक तणाव : रोजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहित जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशीची पाने खावीत.
११. तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून रक्त येणं, तोंड कोरडे पडणे, चव नसणे यांवर उपाय म्हणून पण करू शकतो.
Comments
Post a Comment