Zanducare [CPS] IN

जवस - Flaxseed

 

 

जवस Flaxseed

 जवस- Flaxseed


        जवस हे तुम्हा सर्वांच्या ओळखीचं आहे की नाही माहिती  नाही. तसेच ते तुमच्यातील बऱ्याचश्या लोकांना माहिती असेलच. बहुतेक करून महिलांना तर नक्कीच माहिती असेल. चला तर मग जवस या विषयी माहिती जाणून घेऊया....

        जवसाच्या बियांना जुन्या पिढ्यांपासून प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणून ओळखलं जाते.जवसाची बी आकाराने लहान असली तरी तिचा उपयोग खूप आहे.

        जवसला मराठीत अळशी या नावानेही ओळखले जाते. अळशी हे प्रत्येकाच्या घरातले नाव वाटते. संस्कृत मध्ये जवसाचा उल्लेख 'अथशी ' असा केला आहे.यावरूनच कदाचित 'अळशी ' हे नाव पडलं असावं. हिंदीत अलशी असे म्हटले जाते. इंग्लिश मध्ये जवसाला फ्लेक्स सीड असे म्हणतात.

जवस Flaxseed

जवस - Flaxseed


           जवसाचे Botanical नाव Linum Usitatissimum असे आहे.

        जवस मुख्यत्वे ; युरोप ,आशिया, कॅनडा तसेच अमेरिकेच्या काही भागांमध्ये आढळले जाते. तसेच भारतामध्ये महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश ह्या ठिकाणी जवसाची शेती केली जाते. दिवसेंदिवस जवसाची मागणी वाढतच नाही, तर शेती करण्यामध्ये  पण वाढ झाली आहे .

        आज काल जवसाचा वापर सर्व प्रकारचा पदार्थात गोठवलेले वॉफ्फल्स ते ओटमील या सर्वांमध्ये आढळते. जवस अंबाडीच्या लालसर तपकिरी बियाण्यामध्ये सोनेरी पिवळी असते.

        जवसामध्ये सर्व प्रकारच्या निरोगी घटकांचा समावेश असला तरी, त्यामध्ये त्याची स्वतःची प्राथमिक आरोग्यदायी प्रतिष्ठा आहे. जवसाला गुणाची खाणं म्हणून ओळखले जातं असले तरी जवस योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

        जवस एक चमचा खाल्याने जीवनसत्वे  आणि खनिजांचा व्यतिरिक्त प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ असिडची मात्रा प्रदान करते. १०० ग्रॅम जवसमध्ये १८ ग्रॅम प्रथिने असतात.

        जवसामध्ये अल्फा लिनोलिक असिड असते ते एका प्रकारचे ओमेगा-३ असिड असते त्याचबरोबर जवसामध्ये फायबर व व्हिटामिन "ब", प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम,फॉस्फरस, थायमिन,फायटोएस्ट्रोजेन आणि मिनरल या गोष्टी असतात.

        जवसामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स गुणांमुळे जवस हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेसाठी कोलेजन तयार करणे आणि नव्या पेशींचे निर्माण होत असते.यामुळे त्वचा निरोगी राहते आणि वाढत्या वयावरही त्याचा परिणाम होत नाही. तुमची त्वचा तजेलदार राहते. 

        जवसाचे तेल तंतू आणि जवस चे संभाव्य आरोग्यदायी फायदे आहेत जसे की हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोग कमी करणे, एथेरोस्क्लेरोसिस, मधुमेह, कर्करोग,ऑस्टिओपोरोसिस,न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यांवर गुणकारी आहे.

जवस खाण्याचे फायदे...

१. हृदयासाठी फायदेशीर : 

        जवसामध्ये ओमेगा ३ असिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे जवसाचा समावेश आपल्या आहारात केल्याने हृदय विकरासारख्या आजारांवर फायदेशीर असतो. याशिवाय जवस खाल्याने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास तसेच चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत होते, तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचू देत नाही.

२. बद्धकोष्ठता : 

        जवसाच्या बियांमध्ये फायबर असते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. तसेच फायबरमुळे आपल्या रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

३. संधिवात :

        जवसामध्ये अधिक प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते, तसेच सांधेदुखीचा त्रास ही कमी होण्यास मदत होते.

४. दम्यापासून बचाव :

        जवसामध्ये ओमेगा ३ असिड असते. जे दम्यापासून बाचव करण्यास मदत करतात.

५.यकृताच्या त्रासावर गुणकारी :

         जवसामधील  अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात. त्यामुळे यकृताच्या त्रास दूर होऊ शकतो.

६ अनिमियावर फायदेशीर :

        जवसामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे अनिमियाचा त्रास दूर करण्यास  फायदेशीर ठरते.

७. कर्करोग पासून बचाव करते :

        जवसामध्ये ८०० पट लिग्रांस अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामध्ये फायटोएस्ट्रोजेन  असतात. जे कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात. जवस नियमित खाण्यामुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सर होण्यापासून रक्षण होते.

८. रक्तदाब आटोक्यात ठेवते :

        जेव्हा उच्च रक्तदाबामुळे( हाय ब्लडप्रेशर)  हृदय विकाराचा झटका व किडनी निकामी होणे अशा समस्या उद्भवतात. यामुळे आपला किंवा आपल्या घरातील इतर लोकांचा रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या आहारात किंवा नियमित जवस खाण्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

९. मधुमेहावर फायदेशीर :

        जवस खाल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास उपयोगी पडते.

१०. वजन आटोक्यात ठेवणे :

        आजकालच्या जगात वजन वाढीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या वजनाविषयी लोक खूप जागरूक झालेले दिसतात. अशामध्ये जवस खूपच उपयोगी आहे. जवस खाल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याशिवाय यात फायबर मुबलक प्रमाणात असल्याकारणामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

११. केसांच्या गळतीवर फायदेशीर : 

        केसांच्या निर्मितीसाठी प्रथिने अधिक प्रमाणात लागतात. तसेच ओमेगा ३ असिडमुळे केसांची चकाकी वा आद्रता दोन्ही वाढते. जवस हे प्रथिने आणि ओमेगा ३ असिडच उत्तम स्रोत आहे.

जवसाचे उपयोग : 

१.लघवी साफ होणे, दाह कमी होण्यासाठी : लघवी करतेवेळी दाह किंवा आग होत असेल तर जवसाचा काढा घ्यावा, त्यामुळे लघवीची जळजळ कमी होते तसेच लघवी साफ होते.


२. दंतरोग : हिरड्या मजबूत रहाव्या व दंत दुखिवर उपचारासाठी जवसाच्या तेलाने मसाज केल्यास आराम पडू शकतो.


३. हाडांसाठी उपयुक्त: रोज एक चमचा जवस पावडर किंवा जवसाच्या बिया भाजून खाल्याने आपली हाडे व सांधे मजबूत होण्यास मदत होते.


४. पाठ दुखीवर : पोट पाठ वैगेरे एकसारखे दुखत असेल तर दुखीच्या जागी जवसाचे पोटीस बांधल्याने आराम पडतो


५. कफ पातळ होण्यासाठी : कफ युक्त तापामध्ये जवसाच्या पिठाचे पोटीस करून छाती शेकली असता कफ पातळ होतो.व ताप लगेच उतरण्यास मदत होते.


६. भाजले असता : भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी एकत्र घोटून त्याची पटी दिल्याने भाजलेले लवकर बरे होते.


७. पचनक्रिया : आपल्या रोजच्या आहारात जवसाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.जवसामधील प्रथिने हृदय रोगाचा प्रतिबंध आणि उपचार करण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

        जवसाच्या बियांचे तेल व त्याची उत्पादने पशुखाद्य तयार करण्यास वापरतात.  जवस पासून खूप चविष्ट अशी चटणी पण बनवली जाते.. अश्या पद्धतीने जवस हे खूप उपयोगी व गुणकारी आहे... तुम्हाला माझ्या लेख आवडला असेल अशी मी आशा करते...

 

Comments

Mamaearth [CPS] IN