About Us
| Medicinal Diet Logo |
Medicinal diet म्हणजेच आपल्या आजूबाजूला निसर्गाने दिलेल्या ब ऱ्य च शा गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला लाभदायक आहेत.मग त्या कुठल्या?? ते या लेखातून तुमच्या पर्यंत पोहोचवायचा माझा छोटासा प्रयत्न.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यविषयक लोक खूप जागरूक झाले आहेत.उदा.जिम लावणे,योगा करणे झुंबा वैगेरे, त्यासाठी ते वाटेल ते करतात. पण जे गरजेचे आहे त्याकडे दुर्लक्ष करतात.आता तुम्ही म्हणाल योगा कारण ते योग्य आहे मग ही अशी काय सांगते?? योगा बरोबरच शरीराला पूरक आहार घेणे पण तेवढेच गरजेचे आहे.
रोजच्या जीवनात माझ्या कडून योग्य आहार घेणं राहूनच जातं कारण तेव्हा वेळच पुरत नाही .मे कामानिमित्त घरापासून लांब असायची.त्यामुळे मला डब्बा लावावा लागला. डब्ब्यात काय येत हे तर तुम्हाला माहितीच असेल! अश्या जेवणामुळे मला खूप त्रास झाला. वारंवार आजारी पडायची पण हे असं का होतंय , हेच समजत नव्हत. एकेदिवशी मे माझ्या निवांत वेळेत विचार केला की माझ्या सोबत हे अस का होतंय ?? खूप विचारांती माझ्या लक्षात आले की, माझ्या आहारामध्ये काहीतरी कमी आहे मी योग्य आहार न घेतल्यामुळे मला त्रास होत होता.मी जेव्हा घरी असायची तेव्हा आई मागे लागायची फळ खा ! हे खा ! ते खा! पण जेव्हा मी बाहेर गेली तेव्हा सगळं मलाच करावं लागायचं. तेव्हा मला हे समजलं की सगळीकडे आई तर येऊ शकत नाही ना!! स्वतःच स्वत;साठी आईसारख नाही पण जेवढं जमेल तेवढं तरी करू शकते.
या अनुभवातून लक्षात आले की,अशी मी एकटीच नाही आहे. माझ्यासारखे खूप जण आहेत ज्या योग्य आहाराविषयी माहिती ची गरज आहे . पण त्या विषयीची माहिती मराठीतून फारच क्यवचित उपलब्ध होते.त्यामुळे हा माझा छोटासा प्रयत्न की सर्वांना माझ्या माहितीतून जमेल तसे परिवर्तन करून तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी करता येईल.
Comments
Post a Comment