Zanducare [CPS] IN

हळद - Turmeric



clear drinking glass with brown liquid 

 कोरोना ! कोरोना ! कोरोना !  सगळीकडे कोरोना......

        आता तर ९ महिने झालेत. एवढ्या वेळात तर बाळ पण जगात येते. परवा कुठेतरी ऐकलं !!! मी बरेच दिवस झालेत हळदीचे पाणी पिते त्यामुळे मला कोरोना झाला नाही. मध्यंतरी बाबांनी औषध पण काढलं मग काय सर्वजण आयुर्वेदा कडे धावले पण एवढं सगळ घडत असताना खरंच त्याचा उपयोग होतो का??
कोणी तपासून पाहिलंय का???
        हा प्रश्न आणि असेच असंख्य प्रश्नाचे निरसन हळदी बाबत आपण या लेखातून करणार आहोत.
तुळशी प्रमाणेच हळदीला हिंदू धर्मात धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व आहे.
हळदीचा उपयोग दैनंदिन आयुष्यात केला जातो जेवणामध्ये फोडणी ही महत्त्वाची असते. त्या फोडणीमध्ये हळद असेल तर चवच काही वेगळी  येते ..
        जरी हळदीचा उगम चीन असला तरी हळद भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते व त्याचा मूळ भारत आहे असे आपल्याला वाटते.हळदीला हिंदी भाषेत हल्दी असे म्हणतात.. तर इंग्रजी भाषेत टर्मेरिक असेही म्हटले जाते.

हळद


        हळदीचा शास्त्रीय नाव ( botanical) Kurkuma longa असे आहे.

        हळदीचा रंग पिवळा असतो हे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही... हळदीची पाने सुवासिक असतात व त्याचा वापर स्वयंपाकात केला जातो उदा.. उकडीचे मोदक. माशांचं तिखल... वैगेरे..

        इ.स.पू.र्व. ३००० वर्षापासून  भारतात हळदीची शेती केली जाते. भारत हे हळदीचे उत्पादन घेणारे जगातील सर्वात मोठा देश आहे..

        हळदीला भारताची सुवर्ण वनस्पती असे म्हणतात.. तुम्हाला माहिती आहे का??? जेव्हा तेराव्या शतकात अरबी व्यापाऱ्यांनी हळदीची ओळख युरोपियन बाजारात करून दिली त्यामुळेच कदाचित हळदीला भारतीय केशर म्हणून ओळखलं जात.

        पूर्वीच्या काळात हळदीचा वापर छपाई व कापड रंगविण्यासाठी केला जाई. तसेच हळदीचा वापर टेरमायसिनच्या  उत्पादनात केला जातो..  भारतात हळकुंडे  शुद्धता, समृध्दी, आणि सफलतेचे प्रतीक मानले जाते.          तुम्हाला माहिती आहे का?? हळद ही उष्णवीर्य असल्याकारणामुळे ते कफवातनाशक पित्तरेचक आणि पित्तनाशक आहे त्यामुळे ते साहजिकच ते त्रिदोषनाशक विकारांवर उपयोगी पडते. हळदीमध्ये लिपोपोलीसचीरिडचे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हळदीमधील औषधी गुणधर्मामुळे ताप सर्दी व खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

brown gingers

१०० ग्रॅम हळदी मध्ये खालीलप्रमाणे गुणधर्म असतात.

प्रथिने : ६.३ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ: ५.१ ग्रॅम
कर्बोदक : ६९.४ ग्रॅम
कॅल्शिअम : १५० ग्रॅम
 फॉस्फरस : २८२ ग्रॅम
लोह : १८.५ ग्रॅम
जीवनसत्व : अ  व ब २
ऊर्जा : ३४९ ऊर्जा


हळदी पासून बनविले जाणारे पदार्थ...

 

हळदी पावडर : स्वंयपाकामध्ये  , धार्मिक कार्यामध्ये .

ओलीओरेझिन : विविध प्रकारची लोणची विविध पेय व आइस्क्रीम या मध्ये केला जातो.

हळदीचे लोणचे : ओल्या हळदीच्या मुळांपासून उत्तम प्रकारचे लोणचे बनवले जाते.

हळदीच्या पानाचे तेल : हळदीच्या पानापासून सुगंधी तेल काढतात त्याचा वापर सौंदर्यप्रसाधनंमध्ये केला जातो.

हळदीचे उपयोग :

१. सर्दी खोकला : हळदीचा वापर दैनंदीन आहारात केल्याने सर्दी व खोकला यांपासून बचाव होतो.


२. त्वचे करिता उपयोग : त्वचेचे सामान्य आजार जसे की तारुण्यपिटिका, काळ सरपणा ,रुक्षपणा व काळे डाग दूर करण्यास मदत होते.


३. कॅन्सर वर : हळदीमध्ये करकुमिन नावाचा घटक आढळून येतो. कॅन्सरवर खूप फायदेशीर आहे. 


४.पचनक्रिया : हळदीमध्ये पचनक्रिया सुधारते त्याचप्रमाणे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते शरीरातील चरबी कमी करून वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

हृदय रोगांवर : हळदीमध्ये रक्तामधील कोलेस्टेरॉल व शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाब सुदधा नियंत्रित राहण्यास मदत होते.

        हळद ही एक जंतूविरोधक आहे. त्यामुळे हळदीचा वापर त्वचेच्या जळण्यावर , भाजण्यावर कापण्यावर आणि जखमेवर पण होतो.हळदीमध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे रक्तशुद्धी होण्यास मदत होते. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यास मदत होते. मानसिक विकारांमध्ये जसे निराशा व स्फूर्तीची कमतरता यांमध्ये  उपयोगशीर आहे.

        हळदी मध्ये आढळून येणारं कुरकुमिन नावाचा घटक हळदीला पिवळा रंग देतो. तो कलरींग एजंटप्रमाणे काम करून त्वचेचा रंग खुलवतो.

        अँटी सेप्टिक शिवाय हळदी अँटीबॅटेरियल आणि  अँटी इन्फ्लेमेंतरी प्रॉपर्टी असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे.

        हळद अँटीऑक्सिडंटचे काम करते. त्वचेचे  देखील तारुण्य राहते. त्याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या किंवा इतर समस्या पासूनही बचाव होतो.

हळदीचे फायदे :

1. हळदीचे पाणी प्यायल्याने डोकेदुखी शांत होण्यास मदत होते.
२.हळदीचा वापर केल्यास गुडघे दुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
३.ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर त्यांनी हळदीच्या पाण्याचे रोज सेवन केल्यास त्यांना त्याचा फायदा होईल
४.रोज हळदीच्या पानाचे सेवन केल्याने आपली बुध्दी तल्लख होण्यास मदत होते.
५. पोट साफ होत नसल्यास गरम पाण्यात लिंबू हळद आणि मध टाकून पाणी घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
६. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

७. जखम झाल्यास हळद जखमेवर लावल्यास जखमेतून येणारे रक्त थांबते  व जखम बरी होण्यास मदत होते.
८. घसा खव खव  त असेल किंवा घसा बसल्यास हळद आणि मीठ कोमट पाण्यात एकत्र करून गुळण्या कराव्यात असे केल्याने घशाला आराम पडतो.



Comments

Mamaearth [CPS] IN

Popular posts from this blog

जवस - Flaxseed