गवती चहा - Lemon Grass
गवती चहा गवती चहा हे तर सर्वांच्याच माहितीचे, त्याची अजून वेगळी ओळखा करून देण्याची आवश्यकता नाही.गवती चहा सर्रास सगळीकडे मिळतो. जसं की गावाकडील घराच्या परसबागेत तर शहरातील खोलीच्या गॅलरीमध्ये गवती चहा सगळ्यांचाच ओळखीचा. गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास , संस्कृतमध्ये सुगंध तृण तर हिंदीत गंधबेना अशा विविध नावाने ओळखले जाते. गवती चहाचे शास्त्रीय नाव Botanical Name - Cymbopogon Cirtratus असे आहे. गवती चहाचा अर्क निघतो त्याला ऑईल ऑफ हर्बेना किंवा इंडियन मेलिसा ऑईल असे म्हणतात. गवती चहाचे उत्पादन मुख्यतः आफ्रिका , युरोप , आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडातील उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशामध्ये केले जाते त्याशिवाय भारतामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि केराळत मुबलक प्रमाणात केले जाते. तुम्हाला माहिती असेल बरेचदा आपण सकाळी फ्रेश वाटण्यासाठी किंवा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी चहा घेतो पण तोच जर गवती चहा घेतला तर पटकन ताजतवान वाटत. गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे मानसिक ताणतणावापासून आराम ...