Zanducare [CPS] IN

गवती चहा - Lemon Grass

 

Lemon Grass
गवती चहा

   गवती चहा हे तर सर्वांच्याच माहितीचे, त्याची अजून वेगळी ओळखा करून देण्याची आवश्यकता नाही.गवती चहा सर्रास सगळीकडे मिळतो. जसं की गावाकडील घराच्या परसबागेत तर शहरातील खोलीच्या गॅलरीमध्ये गवती चहा सगळ्यांचाच ओळखीचा.

   गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास , संस्कृतमध्ये सुगंध तृण तर हिंदीत गंधबेना अशा विविध नावाने ओळखले जाते.

 गवती चहाचे शास्त्रीय नाव Botanical Name - Cymbopogon Cirtratus असे आहे.

    गवती चहाचा अर्क निघतो त्याला ऑईल ऑफ हर्बेना किंवा इंडियन मेलिसा ऑईल असे म्हणतात. गवती चहाचे उत्पादन मुख्यतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडातील उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशामध्ये केले जाते त्याशिवाय भारतामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि केराळत मुबलक प्रमाणात केले जाते.

     तुम्हाला माहिती असेल बरेचदा आपण सकाळी फ्रेश वाटण्यासाठी किंवा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी चहा घेतो पण तोच जर गवती चहा घेतला तर पटकन ताजतवान वाटत. गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे मानसिक  ताणतणावापासून आराम मिळू शकतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा झोप शांत येण्यासाठी काही लोक गवती चहाच्या तेलाचा वापर देखील करतात.

        गवती चहा पासून  तेल काढले जाते किंवा पण ते कसे काढले जाते किंवा त्या तेलात काय काय असतं अशी काहीशी माहीत आपण लेखात पाहूया..

    गवती चहाच्या पानातील उर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसिन, निरोल हे घटक असतात. हे तेल सारक, उत्तेजक शामक असल्यामुळे हे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार ,कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वैगेरे विकारांवर उपयुक्त आहे. या तेलाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात तसेच अत्तर मध्ये केला जातो.

 

Lemon Grass
गवती चहा
गवती चहाचे उपयोग: 

कोलेस्टेरॉल कमी होत :

गवती चहा पिण्याने कोलेस्टेरॉल प्रमाण नियंत्रित राहू शकत, तुम्ही त्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी गवती चहा घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

ओरल हेल्थ चांगली राहते :

गवती चहाची पान स्वच्छ धुऊन चघळ्यास दात आणि हिरड्या स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकतो. त्यामुळे तोंडातली जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

वेदना कमी होतात :

 कामाची दगदग, धावपळ यामुळे वरचेवर डोकेदुखी अंगदुखी जाणवत असेल तर गवती चहा उपयोगी आहे. मासिक पाळीतील त्रासा मधून आराम मिळण्यास मदत होते

 फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होतो :

सतत ओलावा आणि उबदारपणा मुळे फंगल इन्फेक्शन चा त्रास होतो. गवती चहा मधील पोषक घटकामुळे तुमची रोगप्रतिारकशक्ती वाढवण्यास मदत होते,त्यामुळे इन्फेक्शनचा त्रास कमी होतो.

गवती चहा चे फायदे : 

1. सर्दी, पडस किंवा ताप आल्यास गवती चहा पिल्याने आराम मिळतो. 

2. पोटात दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास आराम मिळतो. 

3. थंडी ताप किंवा आकडी येत असल्यास गवती चहाने आराम मिळतो.

4. पोट फुगत असल्यास गवती चहाचा काढा घ्यावा 

5. शरीराचा कुठलाही भाग दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने मालिश करावी.

6. फंगल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते 

7. शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. 

8. गवती चहा वापर 'डिटॉक्स' म्हणून केला जातो. 

9. कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. 

10. गवती चहाचा डाययुरेटिक म्हणून वापर केला जातो.

11. गवती चहा मधे असलेल्या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेतील तेलकटपणा दूर करतो.

12. गवती चहा मधे पोटॅशियम भरपूर प प्रमाणात असते जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.

अश्या प्रकारे गवती चहा आपल्याला फारच उपयोगी आहे. त्यापासून बनविल्या जाणारे तेल पण उपयोगी आहे. मी अशा करते तुम्ही ही माहिती फायदेशीर ठरेल..

 

 

Comments

Mamaearth [CPS] IN

Popular posts from this blog

जवस - Flaxseed