जवस - Flaxseed
जवस- Flaxseed जवस हे तुम्हा सर्वांच्या ओळखीचं आहे की नाही माहिती नाही. तसेच ते तुमच्यातील बऱ्याचश्या लोकांना माहिती असेलच. बहुतेक करून महिलांना तर नक्कीच माहिती असेल. चला तर मग जवस या विषयी माहिती जाणून घेऊया.... जवसाच्या बियांना जुन्या पिढ्यांपासून प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणून ओळखलं जाते.जवसाची बी आकाराने लहान असली तरी तिचा उपयोग खूप आहे. जवसला मराठीत अळशी या नावानेही ओळखले जाते. अळशी हे प्रत्येकाच्या घरातले नाव वाटते. संस्कृत मध्ये जवसाचा उल्लेख 'अथशी ' असा केला आहे.यावरूनच कदाचित 'अळशी ' हे नाव पडलं असावं. हिंदीत अलशी असे म्हटले जाते. इंग्लिश मध्ये जवसाला फ्लेक्स सीड असे म्हणतात. जवस - Flaxseed जवसाचे Botanica l नाव Linum U sitatissimum असे आहे. जवस मुख्यत्वे ; युरोप ,आशिया, कॅनडा तसेच अमेरिकेच्या काही भागांमध्ये आढळले जाते. तसेच भारतामध्ये महाराष्ट्र, बिहार...