बहुगुणी आवळा
![]() |
| आवळा |
आवळा हे एक घरगुती नाव व भारतातील सर्वात जुन्या औषाधापैकी एक आहे. आवळ्याला जगभर इंडियन गूसबेरी म्हणून ओळखले जाते.
आवळ्याचे झाड हे मध्यम उंचीचे पानझडी असून ते भारतात सगळीकडे आढळते.तसेच हे श्रीलंका, चीन व मलेशिया मध्ये पण आढळते. आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे की ते अँटीऑक्सिडंट आणि पोषणाचे सर्वात उत्तम स्रोत आहे. आयुर्वेदात आयुष्यआणि ताकद वाढवणारा म्हणून आवळ्याची ओळख आहे. आवळ्याला आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुज्जीवन वनस्पती असे नाव दिले आहे. आवळ्याचे संस्कृत नाव धात्री, आमलक, आमलकी असे आहे, आवळा शरीरातील महत्त्वाचे तीन दोष कफ पित्त आणि वात शमवतो.त्याचे एक नियमित थंड करणारे कार्य आहे आणि घेतल्यास पोटात हल्केपणाच्या संवेदना जाणवतात. डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण असतो व त्यात शक्तिवर्धक रसायने समाविष्ट होत असतात.
आवळ्याचे पोषक गुण :
१. आवळा हा "क" जीवसत्वाचा चांगला स्रोत आहे. सर्वोत्तम भाग म्हणजे आवळ्यामधील टॅनिन फळावर स्वयंपाक किंवा प्रक्रिया केल्यावर स्तिर ठेवतात.
२. आवळ्याचे फळ कॅल्शिअम,फॉस्फरस आणि लोह सारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे.
३ आवळ्यामध्ये कॅरोटीन आणि "ए" जीवनसत्व पण असते.
४. आवळ्यामधे "ई" जीवनसत्व आणि "ब" जीवनसत्व असते.
आवळ्याचे फायदे :
१.विपुल प्रमाणात "क" जीवनसत्त्व,पोटॅशियम, कॅरोटीन, क्रोमियम व भरपूर तंतू या सर्वांमुळे आवळा हा टाईट तो डायबेटिक, हाय कोलेस्टेरॉल, उच्च रकदाब, गाऊट या सर्व आजारांमध्ये गुणकारी आहे.
२. आवळा हा क जीवनसत्वाचा सर्वोतकृष्ट स्रोत असल्या कारणामुळे आपल्या रोजच्या गरजे एवढे क जीवनसत्व आपल्याला अर्धा आवळा खाल्याने मिळू शकते, अन्य फळांमध्ये तेवढेच क जीवनसत्व मिळण्यासाठी एक मोसंबी किंवा एक संत्री किंवा ३ ते ४ सफरचंद किंवा ५ केळी खावी लागतील.
३.उत्तम पित्तनाशक - पित्त असणाऱ्यांना पित्तामुळे डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळ होणे,डोकेदुखी,उलटी अश्या तकरारी साठी आवळा गुणकारी असतो.
४.मधुमेहींना फायदा: क्रोमियम , "क" जीवनसत्व व इन्सुलिन उद्युक्त करण्याचा गुण या तीन गोष्टींमुळे आवळा हा औषधी समान आहे.
![]() |
| आवळा कॅंडी, मोरावळा, ज्यूस |
५. आवळ्या मुळे त्वचेवरील मुरूम व फोड घालवण्यासाठी मदत होते.त्वचा तजेल राहते.
६.गर्भवती महिलांनी आवळ्याचे सेवन केल्याने बाळ व आईचे उत्तम पोषण होते.
७.हिरड्या मधून रक्त येणे,तोंड येणे यांसारख्या आजारावर आवळा हा उत्तम औषध आहे. आवळ्यामुळे त्वचेचे आजार उद्भवत नाही.
८.स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते.
९ मुलायम आणि लांब केसांसाठी आवळा उपयोगी आहे. आवळ्याची पावडर तेलात उकळून केसांना लावावे व रोज एका आवळ्याचे सेवन करावे.
१० आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा,चेहरा तेजस्वी करणारा, नजर तेज करणारा आदींवर गुणकारी आहे.
११ आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आवळा आपण वर्षभर उपलब्ध होत नाही अशामुळे आवळा रस, लोणचे, मुरंब्बा, मोरावळा, ज्यूस, सुपारी, चूर्ण, आवळा कॅंडी, आवळ्याचा सुकवलेला किस आदी पर्याय आहेत.
आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
च्यवनप्राश आणि त्रिफळा ही आवळ्याची लोकप्रिय औषधे आहेत. शाम्पू सारख्या सौंदर्यप्रसाधनामध्ये ही आवळ्याचा उपयोग केला जातो.
![]() |
| आवळा |



Nice 👌 it was so helpful
ReplyDelete